एकी असेल तर यश दूर नाही – ऍड अजित गोगटे
देवगडमध्ये बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीर
प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे एकी असेल तर यश दूर नाही बांधकाम कामगारांनी संघटित राहून आपले प्रश्न सोडवावेत असे प्रतिपादन देवगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अजित गोगटे यांनी केले
बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्ग व भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार वर्गासाठी देवगड तालुक्यात मेळाव्याचे औचीत्य साधून कामगारांसाठी आरोग्य शिबीर पुरस्कार वितरण सोहळा कामगारांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते माजी आम श्री गोगटे म्हणाले बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या विभागाचे मंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार न्याय्य प्रश्नांसाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे या मेळाव्याला चांगली उपस्थिती लाभली आहे
प्रमुख मार्गदर्शक बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे अध्यक्ष श्री. बाबल नांदोसकर म्हणाले बांधकाम कामगारांचे शासन दरबारी अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत रोजदारी करून दैनंदिन जीवन जगत असणाऱ्या या कामगारांना शासन दरबारी न्याय मिळाला पाहिजे आज जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिकारी वर्ग नसल्याने अनेक प्रश्न जैसे थे आहेत हे चित्र बदलून आपला बांधकाम कामगार सर्व योजनांचा लाभ मिळून अधिक सक्षम कसा होईल यासाठी त्यांचे शासन पातळीवरील प्रश्न सुटले पाहिजेत असे सांगितले
सचिव . रवींद्र साळकर आणि अनिल कदम यांनी कामगारांना नूतनीकरण व योजनांचे लाभ याबद्दल बहुमोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री. अनिल कदम यांनी चर्चासत्रात कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या व त्यावर योग्य मार्गदर्शन केले व त्यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासित केले. याप्रसंगी व्यासपीठावर श्री. प्रदीप तांबे, श्री. विनायक मेस्त्री व श्री.दिनेश भोईर आदी उपस्थित होते. मेळाव्यानंतर संघटनेची शहर प्रतिनधी म्हणून कु. गौतमी कदम यांची अध्यक्षांकडून नेमणूक करण्यात आली.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग .