मालवण-धुरीवाडा नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : मालवण तालुक्यातील धुरीवाडा येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली श्रीकृष्ण मंदिर ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिराच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त व मूर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धादिनानिमित्त खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सोहम जांभोरे, तृतीय क्रमांक समर्थ गवंडे, उत्तेजनार्थ दिया लुडबे, शंकर गवस यांनी मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे रुपये दहा हजार रुपये पाच हजार, रुपये तीन हजार रुपये, दोन हजार, रु एक हजार व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकाना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण नितीन जाधव मुंबई, सागर सारंग देवबाग यांनी केले. स्पर्धेत 22 स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी अध्यक्ष दत्तात्रय केळुस्कर, सचिव वसंत गावकर, शंकर शिरसेकर, नामदेव सारंग, शिवाजी केळुसकर, राजेश मणचेकर, सुरेश जोशी, जीवन सावबा, मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, स्पर्धेचे निवेदन अक्षय सातार्डेकर यांनी केले, यावेळी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरणही आहे मान्यवरांचे उपस्थित पार पडले,
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.