तेंडोली येथे १४ एप्रिल रोजी होणार एकेरी नृत्य स्पर्धा
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जय भीम युवक मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती उत्सव १४ एप्रिल व १५ एप्रिल रोजी साजरा केला जाणार असून या निमित्ताने १४ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लहान व मोठ्या गटासाठी एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विष्णू तेंडोलकर यांनी दिली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. प्रतिमा पूजन, सकाळी ११ वा. अभिवादन मिरवणूक, सायं. ७ वा. अभिवादन सभा, रात्री ८ वा. विशाल सेवा फाउंडेशन पुरस्कृत जिल्हास्तरीय लहान गट व मोठा गट एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या मोठ्यासाठी प्रथम क्रमांक ५ हजार १ रूपये, द्वितीय क्रमांक ३ हजार १ रूपये, तृतीय क्रमांक २ हजार १ रूपये, लहान गटासाठी प्रथम क्रमांका ४०० रुपये, द्वितीय क्रमांक ३०० रुपये, तृतीय क्रमांक २०० रुपये व सर्व विजेत्यांना चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री परशुराम गंगावणे, विशाल सेवा फाऊंडेशनचे संस्थापक व युवा नेते विशाल परब, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव उपस्थित राहणार आहेत. १५ एप्रिल रोजी रात्री ८ वा. स्थानिक महिला बचत गटांचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ९ वा. एकांकिका, रात्री १० वा. महाराष्ट्राला लाभली शिवराय भिमरायांची पुण्याई ऑर्केस्ट्रा सादर होणार आहे. तरी सर्व जणांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले असून नृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत तेंडोलकर (९३७०४७१०१८) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष विष्णू तेंडोलकर व सचिव प्रदीप तेंडोलकर यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.