हरकुळ मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य कोंडये गावामधून देणार!

सोसायटी चेअरमन वसंत उर्फ अण्णा तेंडुलकर यांचे प्रतिपादन

कोंडये मध्ये भाजपाचे उमेदवार मनोज रावराणे, बबलू सावंत यांचा प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा परिषद चे उमेदवार मनोज रावराणे व पंचायत समितीचे उमेदवार बबलू सावंत यांना कोंडये गाव हे मोठे मताधिक्य देत विजयी करेल. सर्वात जास्त मताधिक्याचा आकडा हा कोंडये गावात असेल व त्यांचा विजय अजून दमदार केला जाईल असे उद्गार कोंडये सोसायटी चेअरमन वसंत उर्फ अण्णा तेंडुलकर यांनी काढले. कोंडये मध्ये मनोज रावराणे व बबलू सावंत यांच्या प्रचाराचा मोठ्या दणक्यात शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांची गर्दी होती. कोंडये गावच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे तसेच माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून भरघोस निधी देण्यात येणार आहे. निधी कमी पडू देणार नाही तसेच जनतेच्या अन्य समस्या देखील सोडवण्यावर आम्ही प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन मनोज रावराणे व बबलू सावंत यांनी केले. यावेळी माजी सभापती तुळशीदास राव राणे बिनविरोध विजयी झालेल्या पंचायत समितीच्या उमेदवार दिव्या पेडणेकर, करूळ सोसायटी चेअरमन अण्णा तेंडुलकर, सरपंच ऋतुराज तेंडुलकर, उपरपंच रवींद्र तेली, बूथ अध्यक्ष सुहास सावंत, ग्रामपंचायत सदस्य कमलेश तिरोडकर, तृप्ती सावंत, सुहास बिर्जे, रिया शिरोडकर, मानकरी सुरेश तिरोडकर, ग्रामस्थ अनिल गावकर, भाऊ ठाकूर, बाळा धोपटे, संजय सावंत, संजय तेंडुलकर, दीपक तेली, बाळा तेली, विठोबा आंबेरकर, संतोष शेट्ये, मनोहर सावंत, विनीत सावंत, शशी तिरोडकर, रवी फोपे यांच्यासहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!