प्रस्थापितांच्या विरोधात फोंडाघाट मतदार संघामध्ये मोठा रोष!

अनंत पिळणकर यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद
लोरे, वाघेरी मध्ये घरोघरी अनंत पिळणकर व किर्ती एकावडे यांचे जल्लोषात स्वागत
प्रस्थापितांच्या विरोधात माझी लढाई असून गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांनी या मतदारसंघात विकास न केल्याने मला मतदार उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून मतदारांनी माझ्याकडे व्यक्त केलेल्या अपेक्षा निवडून आल्यानंतर पूर्ण करण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे फोंडाघाट मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समितीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार कीर्ती एकावडे यादेखील उपस्थित होत्या. कणकवली तालुक्यातील लोरे, वाघेरी गावात प्रचाराचा धडाका लावला असून घरोघरी भेटी घेत मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याची आवाहन करण्यात आले. आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सिद्धेश राणे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे घोणसरी माझी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरी ग्रामपंचायत सदस्य सचिन मेस्त्री, विशाल राणे, प्रीतम राणे, दर्शन मराठे, प्रशांत सुतार, वैभव तावडे आदी उपस्थित होते.





