दुर्गा राणे, स्वरा कोळी यांची बॅडमिंटन विभागीय स्पर्धेसाठी निवड

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थिनी
अनघा शिरोडकरचे लांब उडीमध्ये यश
येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या दुर्गा नम्रता राणे आणि स्वरा योगेश कोळी यांची शालेय बॅडमिंटन स्पर्धेतील कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्वरा कोळी हिची १४ वर्षांखालील, तर दुर्गा राणे हिची १७ वर्षांखालील गटातून निवड झाली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत या खेळाडूंनी निवड चाचणीत यश मिळवले. विभागीय स्पर्धा १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगली येथील जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहेत.
दरम्यान, कुडाळ तालुकास्तरीय लांब उडी स्पर्धेत अनघा आनंद शिरोडकर हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, प्रशालेच्या प्राचार्या चैताली बांदेकर, मार्गदर्शक व ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे तसेच शिक्षकवृंदाने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.






