मुंबई विद्यापीठाच्या DLLE ‘उडाण’ उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज काॅलेज प्रथम

मुंबई विद्यापीठाच्या DLLE विभागामार्फत आयोजित ‘उडाण’ या उपक्रमांतर्गत ‘पोवाडा’ या सादरीकरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सदर स्पर्धा दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून यश संपादन केले.त्यांची पुढील फेरीसाठी निवड झाली असून ती दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई युनिव्हर्सिट येथे होणार आहे. त्यांना प्रा. भावना मुणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.संगीत साथ देेणारे अनिरुद्ध आचरेकर व कमलाकर पाटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष संजय मिराशी,प्राचार्य नितेश सारंग ,सर्व संस्था चालक यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!