कणकवली नगरपंचायतीच्या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांचे रक्तदान

‘सेवा संकल्प अभियान’ व नगरपंचायतीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली नगरपंचायत, कणकवली येथे ‘सेवा संकल्प अभियान’ तसेच नगरपंचायतीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील, उपनगराध्यक्ष श्री. सुशांत नाईक, नगरसेवक श्री. संकेत नाईक, श्री. राधाकृष्ण नार्वेकर, श्री. लुकेश कांबळे, नगरसेविका श्रीम. जाई मुरकर, श्रीम. दीपिका जाधव आणि प्रशासकीय अधिकारी श्री. अमोल अघम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी श्री. प्रशांत राणे, अक्षता रोळे, सतीश कांबळे, अमोल भोगले, ध्वजा उचले, निकीता पाटकर, मनोज तोरस्कर, सूरज शिवगण, संतोष पाताडे, संदीप उबळकर, राजेश राणे, सुमित कुबल, माधुरी डगरे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग कणकवली तालुका सचिव सुशील परब, नवजीवन ब्लड बँकेच्या सुप्रिया पवार, ऋषिकेश कोरडे, इतर नगरपंचायत कर्मचारी, ब्लड बँकेचे कर्मचारी आणि रक्तदाते उपस्थित होते.

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश…..
या शिबिरादरम्यान नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील, नगरसेवक श्री. संजय कामतेकर, श्री. संकेत नाईक आणि श्री. राकेश राणे व नगरपंचायत कर्मचारी यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या या सहभागामुळे इतर रक्तदात्यांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहन मिळाले.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नगरपंचायतीच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजहिताचा संदेश देण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या उपक्रमातून सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.

error: Content is protected !!