पालकमंत्री नितेश राणेंची समीर नलावडे मित्र मंडळ आयोजित दांडिया ला भेट

समीर नलावडे मित्र मंडळाच्या आयोजनाचे केले कौतुक

राज्यावरील दुष्काळ टळण्याचे पटकी देवीला घातले साकडे

कणकवली पटकी देवी मंदिरा नजीक समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी समीर नलावडे मित्र मंडळ मार्फत दररोज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या दांडिया मध्ये सहभागी होणाऱ्या महिला व युवतींना उत्कृष्ट सहभागाबद्दल बक्षीस दिली जातात. या बक्षिसांचे वितरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी समीर नलावडे मित्र मंडळाच्या या भरगच्च आयोजनाबद्दल कौतुक देखील केले. तसेच पटकी देवी चे दर्शन घेत पालकमंत्र्यांनी राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट टळू दे असे साकडे देवीला घातले.

error: Content is protected !!