जि. प. प्राथ. केंद्रशाळा सुकळवाड येथे शारदोत्सव व भाजपच्या वतीने वह्यांचे वाटप; ग्रामपंचायत सदस्या मा. सौ. प्रमिला पाताडे यांचा पुढाकार

जि. प. प्राथ. केंद्रशाळा सुकळवाड येथे शारदोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत सदस्या मा.सौ.प्रमिला पंढरी पाताडे यांच्या पुढाकाराने व भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोलाचा हातभार लागला असून शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांकडून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.
आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पाताडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. प्रकाश पावसकर, उपसरपंच श्री. किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रमिला पंढरी पाताडे, तसेच श्री. महेश परुळेकर, श्री. भाऊ पाताडे, श्री. दीपक पाताडे, श्री. विलास मसुरकर, श्री. पंढरी पाताडे, पोलीस पाटील श्री. लक्ष्मण काळसेकर आणि श्री. सुभाष म्हसकर उपस्थित होते.
तसेच केंद्रप्रमुख श्री. गावीत सर आणि मुख्याध्यापक श्री. नांदोसकर सर यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केंद्रशाळा सुकळवाडच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शारदोत्सव या ज्ञान व कलेची देवता असलेल्या श्री सरस्वती देवीच्या उत्सवात हे शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाला. सामाजिक भान जपत आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सौ. प्रमिला पाताडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप करताना श्री. बाचीपळे सर यांनी उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.






