पावशी कुंभारवाडीत पत्रकारांसह ग्रामस्थांचे श्रमदान

वनराई बंधारा उभारून दिला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश!

प्रशासनाने केलेल्या जलसंधारणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारणाच्या मोहिमेने वेग घेतला आहे. प्रशासनासोबतच, ग्रामस्थ, ग्राम पंचायती, पंचायत समिती, लोकप्रतिनिधी, पत्रकार, विविध संस्था,एनजीओ, शाळा, महावियालयातील विद्यार्थी यांनी जलसंधारणाच्या कामात स्वतःला वाहून घेतलं आहे. गावोगावी जिथे जिथे पाण्याचे स्रोत उपलब्ध असतील त्या ठिकाणी वनराई बंधारे बांधून पाणी अडवलं जात आहे. शुक्रवारी कुडाळ तालुक्यात पावशी तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच चंद्रकांत कुंभार, पोलीस पाटील शेखर शेलटे, गंगाराम पारकर (बोरभाट), अरविंद बिले (बेलनदी), युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल पावसकर आणि कुडाळ तालुका पत्रकार समिती यांच्या संयुक्त श्रमदानातून पावशी कुंभारवाडी येथील ओहळावर वनराई कच्चा बंधारा बांधण्यात आला.
दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावागावांत बंधारे बांधण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आज हा बंधारा उभारण्यात आला. हा बंधारा बांधताना महिला शक्ती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. अंगणवाडी सेविकांनीसुद्धा श्रमदान करून बंधारा बांधण्याचच्या कामात मोलाचे सहकार्य दिले. या कामात कुडाळ तालुका पत्रकार समितीचे सदस्य सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या.
सध्या संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही हा बंधारा बांधला आहे असे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा पावशीचे माजी सरपंच चंद्रकांत कुंभार यांनी यांनी सांगितले.
यावेळी तालुका पत्रका समिती अध्यक्ष विजय पालकर, प्रमोद म्हाडगूत, रवी गावडे, निलेश जोशी, अजय सावंत, काशिराम गायकवाड, संजय जोशी, संजय तेंडोलकर, प्रसाद राणे, अरुण अणावकर, समुदाय वैद्यकीय अधिकारी एस. डी. कुशे, ग्राम महसूल अधिकारी लता पाटील, अंगणवाडी सेविका दीपावली फोंडके, सरिता माळके, सुचित्रा भोगटे, किशोरी नालंग, अपर्णा पावसकर, आशा स्वयंसेविका राजश्री धुरी, त्रिशा शेलटे, आरोग्य सेविका मनीषा कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांच्या श्रमदानातून बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश देण्यात आला.

error: Content is protected !!