पैसे वाटपाच्या आरोपावरून नाटळ मतदारसंघात बुधवारी रात्री बाचाबाची

मध्यरात्री दोन्ही बाजूचे पदाधिकारी कार्यकर्ते कणकवली पोलिसात

अखेर वादावर तूर्तास पडदा

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा आरोप केल्याने नाटळ मतदारसंघात दारिस्ते या ठिकाणी एक उमेदवार व प्रतिस्पर्धी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वादावादीचा प्रसंग घडला. अखेर हा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. हा प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडला. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री 1 वाजता पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजू चे कार्यकर्ते जमल्याने या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु सदर घटनेबाबत तक्रार नसल्याने या वादावर तूर्तास पडदा पडला.

error: Content is protected !!