कणकवली नगरपंचायत ची लक्षवेधी उपनगराध्यक्ष पदाची निवड 13 जानेवारी रोजी

याच दिवशी पहिल्या सभेत स्वीकृत नगरसेवक निवडी देखील होणार
शहर विकास आघाडी कडून सुशांत नाईक, विरोधात भाजपाकडून उमेदवार कोण?
कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष
अखेर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नगरपंचायत चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी 13 जानेवारी 2025 रोजी 11 वाजता कणकवली नगरपंचायत च्या सर्व नगरसेवकांची या टर्म मधील पहिली सभा बोलावली आहे. या सभेमध्ये कणकवली उपनगराध्यक्ष निवडी सहित स्वीकृत नगरसेवक निवडी देखील केल्या जाणार आहेत. उपनगराध्यक्ष निवडीकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यामध्ये 13 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी तर दुपारी 1 वाजता वैधरित्या नामनिर्देशन पत्र दाखल झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. दुपारी एक 1.30 वाजता उपनगराध्यक्ष पदाकरता दाखल केलेली उमेदवारी मागे घेणे घेता येणार. आहे 1.30 वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमे जाहीर करण्यात येणार आहेत . तर दुपारी 1. 45 नंतर आवश्यकता असल्यास उपनगराध्यक्ष पदाकरिता मतदान घेणे व निकाल घोषित करण्यात येणार आहे. नगरपंचायत चे नगराध्यक्ष संदेश पारकर हे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पिठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाकरिता कणकवली शहर विकास आघाडी कडून सुशांत नाईक यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता या निवडणुकीत भाजपा पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्यात येणार का? ते पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.





