परमहंस भालचंद्र महाराज संस्थानची 11 जानेवारी रोजी शिष्यवृत्ती सराव परिक्षा

एसएम हायस्कूलला कणकवली परिक्षा केंद्र
परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित शिष्यवृत्ती सराव परिक्षा रविवार 11 जानेवारी रोजी होणार आहे. या परिक्षेची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कणकवली केंद्रामध्ये एमपीएससी परिक्षेमुळे बदल करण्यात आला असून ही परिक्षा कणकवली कॉलेज ऐवजी एसएम हायस्कुल कणकवली येथे होणार आहे. तर सावंतवाडी विभागातील परिक्षा केंद्र कळसूलकर हायस्कुल हेच राहील.
ही परिक्षा मराठी माध्यम पेपर -1 मराठी व गणित, पेपर -2 इंग्रजी व बुध्दिमत्ता, इंग्रजी माध्यम पेपर -1 इंग्रजी व गणित आणि पेपर -2 मराठी, बुध्दिमत्ता. सकाळी 10.30 ते 3 वा. या वेळेत ही परिक्षा होणार आहे. पेपर -1 11 ते 11.30 वा तर पेपर -2 1.30 ते 3 वा. यावेळेत होणार असून विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 वाजता परिक्षा हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. उत्तर पत्रिका लिहीताना काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करावयाचा आहे. विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक परिक्षेदिवशी परिक्षा केंद्रावर लावण्यात येतील. दोन पेपरच्या मध्ये 50 मिनिटांचा अवधी असल्याने विद्यार्थ्यांनी सोबत जेवणाचा डबा आणावा. परिक्षा केंद्रावर कोणतीही अडचण असल्यास तेथील प्रतिनिधींशी संपर्क साधावा. सावंतवाडी केंद्रासाठी संपर्क प्रमुख रावजी परब 9423300144, सिध्देश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा. कणकवली केंद्रासंदर्भात विजय केळुसकर 9421238925, गजानन उपरकर 9561347525, सदानंद गावकर 8411842176 यांच्याशी संपर्क साधावा. सर्व प्रविष्ठार्थी विद्यार्थी व पालकांनी याची नेोंद घ्यावी आणि परिक्षा केंद्रावर वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.





