जानवलीतील गणेश मूर्तिकार राजाराम मुरकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील जानवली मुरकरवाडी येथील रहिवासी व ज्येष्ठ गणेश मूर्तिकार राजाराम रामचंद्र मुरकर (वय 78) यांचे आज मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. गणेश मूर्तिकार म्हणून राजाराम मुरकर हे प्रसिद्ध होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या काळातील नामवंत बरखंदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज जानवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.





