कुडाळात विनामूल्य तत्वावर बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर

कुडाळ : २०१७ मध्ये सुशिला गणेश निगुडकर ट्रस्टचे. डॉ संजय निगुडकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर आणि मूळ सिंधुदुर्गातील मुंबईस्थित डॉ. अमेय देसाई यांच्या पुढाकाराने सुरु झालेला जिल्ह्यातील गरजवंत बालरुग्णांवरच्या शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम यंदा २२ आणि २३ एप्रिल रोजी कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या तथा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या मार्फत डॉ. श्रीपाद पाटील यांच्या सहकार्याने नियोजित केलेला असून दरवर्षीप्रमाणे प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक तसेच मुंबईतील सायन रुग्णालयातील बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. पारस कोठारी आणि त्यांची टीम दोन दिवस गरजवंत लहान मुलांवर विनामूल्य तत्वावर शस्त्रक्रिया करणार आहे. सदरील शिबिरात हर्निया, हायड्रोसील, अन-डिसेंडेड टेस्टीस, अपेंडिक्स , हायपोस्पाडिया या रुग्णांना शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार असून त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. तसेच यंदाच्या वर्षी या शिबिरातील बालरुग्णांच्या सोबत रुग्णालयात राहणाऱ्या एका पालकाची भोजनाची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ कुडाळमार्फत करण्यात येणार आहे. शनिवारी दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शस्त्रक्रियांना प्रारंभ होणार असून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत साधारणतः २५ शस्त्रक्रिया संपन्न करण्याचा मानस असल्याचे या उपक्रमाचे समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी यावेळी सांगितले. मागील पाच वर्षांप्रमाणेच यंदाही जिल्हावासीयांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संजय निगुडकर, उमेश गाळवणकर आणि डॉ देसाईंनी या वेळेस केले आहे.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कुडाळ

error: Content is protected !!