मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिम्मित कनेडी बाजारपेठ येथे ग्रामस्थांना जिलेबी व काजू रोपांचे वाटप

माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते वाटप
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कनेडी बाजार पेठ येथील भाजप नाटळ- सांगवे विभागीय कार्यालय येथे ग्रामस्थांना जिलेबी व काजू रोपे वाटप माजी जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे,माजी प स सदस्या राजश्री पवार सांगवे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर दारिस्ते उपसरपंच संजय सावंत, भाई गावकर, मिलिंद बोभाटे,विनोद सावंत मीनल पवार, सुधीर सावंत तसेच विभागातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.