महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट टिम मध्ये आचरेची शिल्पा गावकर करतेय राज्याचे प्रतिनिधित्व

चॅम्पियन चषक जिंकत केले महराष्ट्राचे नाव उज्वल

गुजरात मध्ये झालेल्या मानस
महिला क्रिकेट स्पर्धेत गुजरात संघावर मात करत चॅम्पियन बनलेल्या महाराष्ट्र संघात आचरा गाऊडवाडी येथील सुकन्या श्रीमती शिल्पा गावकर हिने सहभागी होत आपल्या उत्कृष्ट खेळाने संघाला विजयी बनविण्यात महत्वाचे योगदान दिले होते.राष्ट्रीय. ्
स्तरावर आचरे गावच्या सुकन्येने चमक दाखवित गावाचे नाव उज्ज्वल केल्या बद्धल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साई कृपा दिव्यांग संस्था कसाल अध्यक्ष अनिल शिंगाडे यांच्या संस्थेची सभासद असलेल्या शिल्पा गांवकर यांच्यातील क्रिकेट गुण हेरत साहस प्रतिष्ठानच्या सौ रुपाली पाटील यांनी त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले होते.शिल्पा गावकर यांचे पती कुणाल डोंगरे यांनी यासाठी प्रशिक्षक बनत शिल्पा गांवकर हिच्या कडून कसून सराव करुन घेतला होता. पतीकडून शिल्पा गांवकर यांनी क्रिकेट चे धडे गिरवले होते.याबाबत बोलताना दिव्यांग शिल्पा गावकर यांनी सांगितले की १०जानेवारी ला मुंबई मध्ये वसई विरार महानगर पालिका ग्राऊंडवर महाराष्ट्र दिव्यांग महिलांचे खेळविण्यात आलेल्या संघांमधून महाराष्ट्र राज्य स्तरीय क्रिकेट टीम साठी १३खेळाडू निवडण्यात आले होते.यात उत्तम कामगिरीच्या जोरावर रुपाली पाटील आणि महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट टिमचे प्रशिक्षक रमेश सरतापे यांनी महाराष्ट्र टिम साठी आपली निवड केली असल्याचे तिने सांगितले . गुजरात येथे झालेल्या मानस कप राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत
गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश महाराष्ट्र या चार राज्यांचे संघ सहभागी झाले होते.यात अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने मध्यप्रदेश संघावर मात करत चॅम्पियन मानस चषक जिंकला होता.यात आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण,बाॅलिंगच्या कौशल्यावर या विजयात योगदान देत
दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नाव उज्ज्वल केले.तीच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!