आशिये गावातील गाळ काढण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी पाळला

आशिये सरपंच महेश गुरव यांचे प्रतिपादन

आशिये येथे गडनदी पात्रातील गाळ उपसण्याचे काम सुरु

आशिये गडनदीपात्रात गाळ साचल्यामुळे खालचीवाडी येथे पूरस्थिती निर्माण होत होती. गेल्यावर्षी महापूर आल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी गाळ काढून देण्याचा शब्द दिला होता , त्या शब्दाला जागण्याच काम ना. नितेश राणे यांनी केलं आहे. गेल्या 8 दिवसांपासून गडनदी पात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांचे आशिये ग्रामपंचायतच्यावतीने आभार मानत आहोत. आशिये खालचीवाडी मध्ये पूरस्थितीची समस्या कायमस्वरुपी मार्गी लागेल , असा विश्वास सरपंच महेश गुरव यांनी व्यक्त केला.

आशिये गडनदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी व नियोजन ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी सकाळी करण्यात आली. यावेळी आशिये सरपंच महेश गुरव , उपसरपंच संदीप जाधव , माजी सरपंच , शंकर गुरव, माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर, पांडुरंग बाणे, ग्रा.प.सदस्य सुहास गुरव , बाबा उर्फ भिवा गुरव, बाळकृष्ण गुरव, बाळकृष्ण पुजारे, श्रीधर माणगावकर, धोंडू माणगावकर, मंगेश गावडे, प्रकाश पांचाळ, प्रमोद पांचाळ, प्रवीण गुरव, गणेश गुरव, बाबाजी गुरव, विनोद पुजारे, रवींद्र पुजारे, रत्नागर गुरव, धोंडू गुरव, मिलिंद गुरव, निलेश पुजारे, अमित गुरव, चंद्रकांत गुरव, संजय बाणे, ग्रामसेवक राकेश गोवळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच महेश गुरव म्हणाले , गेली कित्येक वर्षे आशिये खालचीवाडी येथील ग्राम‌स्थ पूरस्थिती झाल्यानंतर जीव मुठीत घेवून जगत होते. गेल्या वर्षी अशी जुलै – ऑगस्ट मुळे महापूर आलेला होता. खालचीवाडी येथील 40 ते 45 कुटुंबांचा गावाशी आणि तातुक्याशी संपर्क तुटला होता. त्यावेळी या पूरस्थितीची बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर तत्कालीन आ. नितेश राणे यांनी जिल्हाधिका-यांना फोन करत पूरस्थितीची कल्पना दिली. आशिये मध्ये ग्रामस्थांना तात्काळ मदत करण्याच्या सुचना दिल्यानंतर तहसिलदार दीक्षांत देशपांडे व प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर आमदारांचा मलाही फोन आला होता , त्याचवेळी पुढच्या पावसापूर्वी या नदीतील गाळ काढण्याची जबाबदारी माझी राहिल , आशिये खालचीवाडीत जी काही गाळाची समस्या आहे , ती सोडवली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसापासून आशिये गडनदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु झालेलं आहे , त्यामुळे मंत्री नितेश राणे यांचे आशिये ग्रामपंचायतच्यावतीने आभार मानतो.

ग्रा.प.सदस्य सुहास गुरव म्हणाले , अनेक वर्षे पूरस्थितीमुळे 40 – 45 घरांना कायम धोका असायचा. मात्र ही समस्या सरपंच महेश गुरव यांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडल्यानंतर आमच्या मागणीची दखल घेवून गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे , त्याबद्दल मंत्री राणेंचे आम्ही ऋणी आहोत.

error: Content is protected !!