कुडाळमध्ये उद्या वार्षिक पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवार दि.21 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता बॅ.नाथ पै संकूल, एमआयडीसी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणारा व्याधकार ज्येष्ठ पत्रकार कै. ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर तांबट (कणकवली), छायाचित्रकार पुरस्कार राजन नाईक आणि पत्रकार कै. वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार भूषण देसाई यांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या पत्रकारांचा व पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेशवंदनाने व ओंकार सावंत याच्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रित गीतावर होणार आहे
या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळच्या नगराध्यक्षा सौ.आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, बॅ.नाथ पै.शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, उद्योजक बापू नाईक, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर पिंगुळी सरपंच अजय आकेरकर,व रजनीकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर व सचिव विलास कुडाळकर यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.