कृषी विज्ञान केंद्राचे नैसर्गिक शेतीत मोठे योगदान*कृषी विज्ञान केंद्रात जैविक निविष्ठा संशोधन केंद्राचा शुभारंभशेतकऱ्यांनी स्वतःला उद्योजक म्हणावेअन्न सुरक्षेबरोबर अन्नद्रव्य सुरक्षतेची गरज

किर्लोस कृषि विज्ञान केंद्रास अटारी पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शाकिर अली सय्यद, यांनी भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. यावेळी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शाकिर अली सय्यद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःला उद्योजक म्हणून काटेकोरपणे शेती करावी. सद्या अन्नसुरक्षे (Food Security) सोबतच अन्नद्रव्य सुरक्षेची (Nutritional Security) ची मोठी गरज आहे. म्हणून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे जेणेकरून दर्जेदार व रासायनिक अवशेष मुक्त अन्नधान्याची निर्मिती करता येईल. किर्लोस कृषि विज्ञान केंद्राचे नैसर्गिक शेतीमध्ये उत्कृष्ट काम असून केंद्राचे नैसर्गिक शेती प्रसारामध्ये मोठे योगदान आहे. नैसर्गिक शेती करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकर्यां नी केंद्राकडून मार्गदर्शन घ्यावे असे ते म्हणाले. कृषी विज्ञान केंद्र हा भारत सरकारचा उपक्रम आहे. देशात एकूण ७३१ कृषी विज्ञान केंद्रे आहेत. ही कृषी विज्ञान केंद्र शेतकरी आणि शास्त्रज्ञ यामधील एक दुवा आहेत. काळाच्या गरजेनुसार शेतीमधील जे बदल होत आहेत त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली पाऊले टाकून स्वतःला उद्योजक म्हणून शेती करावी असे डॉ. शाकिर अली सय्यद म्हणाले.
नैसर्गिक शेती अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राने जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्राचा शुभारंभ डॉ. शाकिर अली सय्यद यांच्या शुभहस्ते करण्यात आला. डॉ. शाकिर अली सय्यद यांनी केंद्राच्या प्रक्षेत्राला भेट देऊन फळ प्रक्रिया युनिट, जैविक निविष्ठा संसाधन युनिट, कुक्कुटपालन, गोशाळा व शेळीपालन यांना भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत उपस्थित होते. त्यांनी शेतकर्यांाना मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष प्रदीप सावंत यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना कृषी मित्र प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी प्रास्ताविक केले व केंद्राच्या उपक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्री. लक्ष्मण कुरकुटे व उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल माळी उपस्थित होते. तसेच मालवण तालुका कृषी अधिकारी श्री. एकनाथ गुरव, कणकवली तालुका कृषी अधिकारी सौ. वैशाली मुळे, किर्लोस सरपंच सौ. साक्षी चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामपूरकर, डॉ. केशव देसाई, प्रक्षेत्र व्यवस्थापक विवेक सावंत भोसले, संगणक सहाय्यक सुमेधा तावडे व अधिकारी व कर्मचारी मंगेश पालव, नरेंद्र सावंत, झिलु घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर, सुधीर पालव, अरुण पालव उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!