आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात.

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत बुद्धिबळ स्पर्धा तीन गटांमध्ये नुकतीच संपन्न झाली.
बुद्धिबळ प्रशिक्षक श्री.आडेलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले वर्षभर आयडियल ची मुले बुद्धिबळ प्रशिक्षण घेत आहेत, याच उपक्रमांतर्गत या उपक्रमाचे फलित म्हणून इयत्ता पहिली ते नववी पर्यंत एकूण तीन गटात ही स्पर्धा आयोजित केली गेली होती . या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या स्पर्धेतील गटवार विजेते
गट – अ
1)विहान माळगांवकर
2) समर्थ वर्देकर
3)रिद्धी तायशेटे
4)अर्णव माने
गट-ब
1) गौरव तायशेटे
2) हिमांशू वाळके
3)भावेश घाडीगावकर
4)ओम मठकर
गट – क
1)स्वानंद आमडोसकर
2)संनिधी उचले
3) ऋग्वेद मराठे
4)तनया राणे
स्पर्धेचे परीक्षण श्री.आडेलकर सर यांनी केले तर स्पर्धेच्या नियोजनासाठी प्रशाला शिक्षक श्री राहुल मोरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.