हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २२ रोजी मालवण मध्ये तर २३ रोजी कुडाळ मध्ये रक्तदान शिबीर

       हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ आणि मालवण तालुक्यात रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण शिवसेना, युवासेनेच्या वतीने २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तर २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता कुडाळ शिवसेना, युवासेनेच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरास जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, मंदार शिरसाट, मंदार केणी, बबन बोभाटे, मंदार ओरसकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!