कणकवलीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे जयंती होणार साजरी

उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारी 2025 रोजी कणकवली शाखेत सकाळी 10 वाजता साजरी करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 10.30 वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी फळे वाटप करण्यात येणार आहे. तरी कणकवली तालुक्यातील सर्व आजी माजी शिवसेना, युवासेना, महिला, शिवसेना संलग्न इतर सेलच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख कन्हैय्या पारकर आणि प्रथमेश सावंत यांनी केले आहे.