प्रभाकर धुरी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार


प्रतिनिधी l दोडामार्ग: दोडामार्ग तालुका पत्रकार सामितीचे २०२४-२५ चे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.पत्रकार समितीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ‘ कोकण नाऊ ‘ चे सिनियर करस्पॉन्डंट प्रभाकर धुरी यांना तर उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार लवू परब यांना जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात अध्यक्ष संदीप देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली.यावेळी सचिव गणपत डांगी, खजिनदार रत्नदीप गवस,प्रभाकर धुरी,तेजस देसाई,वैभव साळकर, लखू खरवत,संदेश देसाई,समीर ठाकूर, लवू परब आदी उपस्थित होते.यावेळी यशस्वी उद्योजक पुरस्कार २०२४ राजू भोसले, (दोडामार्ग)आणि बाबा टोपले (भेडशी) यांना तर उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार २०२४सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता अनिल बडे यांना जाहीर करण्यात आला. प्रभाकर धुरी गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहेत.त्यांना यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार,महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आणि मसुरे, मालवण येथील संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे.समितीच्या आजच्या बैठकीत प्रभाकर धुरी व लवू परब यांच्या नावांना सर्वानुमते संमती देण्यात आली. यावेळी ओरोस येथे बुधवारी (ता.२९) होणाऱ्या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. सभा खेळीमेळीत झाली.