बॅडमिंटन लिग स्पर्धेमधून कणकवलीत नवीन खेळाडू निर्माण होतील

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन
तरुण पिढीला ही स्पर्धा दिशा दर्शक
कणकवली शहरातील युवकांना खेळाच्या माध्यमातून एक नवीन दिशा देण्याचे काम व त्या सर्वांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ही स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. कणकवली शहराच्या राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक सह क्रीडा क्षेत्रात देखील ही स्पर्धा एक मोठी योगदान देणारी ठरत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठे खेळाडू निर्माण व्हावेत व यातून या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने उद्देश सार्थ ठरावा असे प्रतिपादन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. कणकवली शहरात सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन लीग 2025 च्या माध्यमातून कणकवली बॅडमिंटन क्लब व के एन के स्मॅशर्स यांच्या वतीने बॅडमिंटन लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री नलावडे बोलत होते. कणकवलीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये सुरू करण्यात आलेल्या या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, डॉ. विद्याधर तायशेटे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, किशोर राणे, दीपक बेलवलकर, चारुदत्त साटम यांच्यासह अन्य उपस्थित होते. गेली अनेक वर्ष ही स्पर्धा घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या विविध ग्रुप मधून एक चांगले खेळाडू निर्माण व्हावेत हा उद्देश ठेवून ही स्पर्धा यापुढेही भरगच्च सुरू ठेवा असे आवाहन माजी नगराध्यक्ष नलावडे यांनी केले. दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली