भाजपा सदस्य नोंदणी अभियानातयुवा मोर्चाने घेतला पुढाकार

कणकवली कॉलेज मध्ये राबवले अभियान

भारतीय जनता युवा मोर्चा वतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियानात युवा मोर्चाने सक्रिय पुढाकार घेतला. आज ७ जानेवारी रोजी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र वतीने प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांच्या नेतृत्वात राज्यभर सदस्य नोंदणी ड्राईव्ह घेण्यात आला. प्रत्येक तालुक्यात युवा मोर्चा वतीने नोंदणी शिबिर घेण्यात आली असून आज कणकवली तालुक्यातील बाजारपेठ आणि कणकवली कॉलेज येथे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना भारतीय जनता पार्टी सदस्य होण्यासाठी युवा मोर्चाने पुढाकार घेतला आहे. आजच्या शिबिरासाठी जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष अण्णा खाडये,शहराध्यक्ष सागर राणे, जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर, उपाध्यक्ष प्रशांत राणे, नयन दळवी,श्रेयस चिंदरकर,दादू राणे, अवधूत तळगावकर,मंदार मेस्त्री, प्रथमेश दळवी आदी युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!