कणकवली पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी

भव्य प्रवेशद्वार व विद्युत रोषणाईने पर्यटन महोत्सवाची उत्कंठा वाढली

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

कणकवली भारतीय जनता पार्टी आयोजित कणकवली पर्यटन महोत्सव 2025 ची जय्यत तयारी करण्यात आली असून कणकवली नरडवे चौकात भव्य असे प्रवेशद्वार व नरडवे रोड परिसरात विद्युत रोषणाईने या पर्यटन महोत्सवाची इंट्री लक्षवेधी करण्यात आली आहे.या महोत्सवाच्या तयारीचा बुधवारी प्रत्यक्ष जागेवर भेट देत आढावा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतला. या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील दिग्गज कलाकार या पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. व या निमित्ताने कोणतीही कसूर राहू नये याकरता माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम प्रयत्न करत आहे. तब्बल 70 स्टॉल या महोत्सवानिमित्त लागले असून, या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडॉल विजेता सलमान अली हे उपस्थित राहणार आहेत. यांच्या गाण्यांचा जलवा कणकवलीकर यांना अनुभवता येणार आहे. उद्या गुरुवार 9 जानेवारी रोजी रात्री या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या शुभारंभ प्रसंगी राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह अन्य उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. यावेळी माजी गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, किशोर राणे, माजी नगरसेवक विराज भोसले, अभिजीत मुसळे, चारुदत्त साटम, राज नलावडे, राजा पाटकर, नवराज झेमणे आदी उपस्थित होते .

error: Content is protected !!