कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित 52 वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल फोंडा या ठिकाणी संपन्न झाले.या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शेठ न. म. विद्यालय व उद्योगश्री प्र. ल. पाटील ज्युनिअर कॉलेज खारेपाटण मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये माध्यमिक गटात मेहविश मुल्ला आणि पल्लवी माने या दोन विद्यार्थिनीनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तसेच माध्यमिक गटामध्ये निबंध स्पर्धेत उकबा काझी, वक्तृत्व स्पर्धेमध्ये दुर्वेश नानिवडेकर, विज्ञान प्रतिकृती मध्ये विनायक पांचाळ या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेमध्ये रेवन राऊळ व प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये अभिनव हरयाण व रेवन राऊळ या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षकानी विशेष परिश्रम घेतले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सेक्रेटरी श्री. महेश कोळसुलकर, सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!