जनता विद्यामंदिर त्रिंबक येथेनिबंध स्पर्धा संपन्न

दत्ता पवार तसेच भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत मातोश्री शालिनी शिवराम पवार यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे सोमवारी ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेसाठी वात्सल्यसिंधू आई हा विषय ठेवण्यात आला होता. लहान गटात १३ तर मोठ्या गटात ३२ स्पर्धक अशा एकूण ४५ स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुरेन्द्र सकपाळ, एकनाथ गायकवाड, प्रशांत गोसावी व अमेय लेले यांनी प्रयत्न केले.या स्पर्धेसाठी
लहान गट बक्षीसं प्रथम क्रमांक रु.१०००/- रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक (आई समजुन घेताना), द्वितीय क्रमांक रु. ७००/- रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक तृतीय क्रमांक रु. ५००/- रोख,स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक आणि मोठा गट प्रथम क्रमांक रु. १५००/- रोख ,स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक , द्वितीय क्रमांक रु. १०००/- रोख,स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक, तृतीय क्रमांक रु.५००/- स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक तर दोन्ही गटांना उत्तेजनार्थ प्रथम रु.३००/- रोख व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ द्वितीय रु २००/- व प्रमाणपत्र अशी बक्षीसं देण्यात येणार आहेत .बक्षीसं वितरण गुरुवार २३ जानेवारी २०२५ रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक येथे केले जाणार असल्याचे वाचनालय अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी सांगितले.

error: Content is protected !!