ठाकरे सेनेच्या कुवळे उप शाखाप्रमुखासह अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हातात

देवगड मध्ये ठाकरे सेनेला अखेरची घरघर

ठाकरे सेनेच्या कुवळे येथील उप शाखाप्रमुख रामचंद्र लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांचे विकासाशी नाते आहे, यामुळे आमदार नितेश राणे यांनी केलेला विकास पाहता त्यांचेच नेतृत्व आम्हाला मान्य आहे, असे प्रवेश करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
रामचंद्र लाड, नरेश लाड, स्वप्निल कुवळेकर, विलास फोंडेकर, संदेश फोडेकर, संदेश कदम, सुयोग कदम, चेतन कदम, आनंद कदम, ऋषी कदम, निलेश पवार, नितेश कदम यांच्यासह अनेक नागरिकांनी प्रवेश केला आहे.

महिन्याभरात हजारो नागरिकांनी ठाकरे मधून भाजपामध्ये प्रवेश केल्याने देवगडमध्ये ठाकरे गटाला घरघर लागली आहे.

error: Content is protected !!