दिवाळी बाजार भरवण्याची संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव कणकवलीत

समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्ष कणकवलीत केले जाते आयोजन

कणकवली रोटरी क्लब अध्यक्षांच्या वतीने दिवाळी बाजाराचे उद्घाटन

समीर नलावडे मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गोरगरीब जनतेच्या घरात बनवलेल्या दर्जेदार वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. अशा वस्तू दिवाळीच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार व एकाच जागी देण्याची संकल्पना समीर नलावडे व त्यांचे मित्र मंडळाने गेले अनेक वर्षे राबवली व ती सत्यात देखील उतरवली. ही कणकवलीच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे भरणारा दिवाळी बाजार हा एकमेव असल्याचे गौरव उद्गार या दिवाळी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी काढले. समीर नलावडे मित्र मंडळ आयोजित दिवाळी बाजाराचे उद्घाटन कणकवली रोटरी क्लब चे अध्यक्ष जगदीश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत संतोष कांबळी, दीपक बेलवलकर, लवु पिळनकर, महेंद्र मुरकर, तृप्ती कांबळी, उमा परब, राजश्री रावराणे, अनिल कर्पे ,दीपक अंधारी आदी उपस्थित होते. घरगुती बनवलेल्या फराळाचे साहित्य, आकाश कंदील, पणत्या यासह अन्य अनेक वस्तू या दिवाळी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. गतवर्षी या दिवाळी बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली होती. नागरिकांचां या दिवाळी बाजाराला दरवर्षी चांगल प्रतिसाद असतो.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!