तांबळडेग शाखाप्रमुख पदी महेश येरम यांची नियुक्ती

तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले मार्गदर्शन
तांबळडेग येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सुशांत नाईक यांनी तांबळडेग येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व त्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तांबळडेग शाखाप्रमुख पदी महेश येरम यांची नियुक्ती करण्यात आली. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्या हस्ते महेश येरम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत, उपजिल्हाप्रमुख बुवा तारी, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रमेश जोगल, विभागप्रमुख कांता गांवकर, युवासेना तालुका समन्व्यक मनोज भावे, तांबळडेग शाखा संघटक उपाणेकर, संतोष परब, ओंकार सारंग, राजेश परब, किरण राजम, आयुष राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
देवगड प्रतिनिधी