साकेडी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी राजु सदडेकर यांची बिनविरोध फेर निवड

निवडी बद्दल सर्वच स्तरातून केले जातेय अभिनंदन

साकेडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा विठ्ठल उर्फ राजू सदडेकर यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली. साकेडी ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच सुरेश साटम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या प्रसंगी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सदडेकर यांची फेर नियुक्ती करण्यात आली. श्री. सदडेकर हे साकेडी सोसायटीच्या संचालक पदी कार्यरत असून मागील वर्षभरात समितीकडे दाखल झालेले तंटे त्यांनी यशस्वीपणे निवारण केले. त्यांच्या या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!