राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या माध्यमातून शिवडाव येथे गणेश घाटाचे काम
अबीद नाईक यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील शिवडाव तांबटवाडी येथील गणपती विसर्जनासाठी गणेश घाट बांधुन देण्याची ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते नुकतेच गणेश घाटाचे लोकार्पण करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील गाव शिवडाव तांबटवाडी येथील ग्रामस्थांनी माजी उपसरपंच सतीश पाताडे यांच्या माध्यमातुन गणपती विसर्जनासाठी गणेश घाट बांधुन देण्याची मागणी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडे मागील वर्षीच्या गणेश चतुर्थीला केली होती. व त्यावेळी अबिद नाईक यानी गणेश घाट बांधुन देणार असे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे ह्या वर्षी गणेश चतुर्थी पूर्वी जिल्हा नियोजन निधीतून गणेश घाट बांधुन पूर्ण केला व आज गणपतीच्या विसर्जनाच्या सातव्या दिवशी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते गणेश घाटाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी गावातील ग्रामस्थांनी माता भगिनी यांनी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले त्यावेळी माजी उपसरपंच व राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे अबिद नाईक यांच्या कन्या रिजा नाईक, राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी कणकवली महिला तालुकाध्यक्ष स्नेहल पाताडे,गजानन पाताडे, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे,वसंत कोरगावकर, आणा मोरये,संदीप पाताडे, महेश शिरसाठ,दिलीप पाताडे, प्रकाश शिरसाठ, दिलीप तवटे,प्रकाश पाताडे,दिपक पाताडे, रोहण पाताडे,रंजीता पाताडे ,कृष्णा मोरये धनंजय पाताडे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.