खत भेसळ प्रकरणी मार्केटिंग मॅनेजर व वेंगुर्ला खरेदी विक्री संघ व्यवस्थापक यांची निर्दोष मुक्तता

संशयीतांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. प्रज्ञा खोत, ॲड. शुभम देवळे, ॲड. शाम गोडकर यांचा युक्तिवाद

18.18.10 ‍मिश्रणाच्या खतामध्ये भेसळ असल्याप्रकरणी वर्धमान फर्टिलायझर्स ॲन्ड सिड्स प्रा. लि. कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर श्री. राजेश स्वामी आणि वेंगुर्ला तालुका खरेदी विक्रि संघाचे व्‍यवस्थापक हनुमान बाबाजी वराडकर यांची मे. मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस श्री. ए. ए. चेंडके यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. याकामी आरोपी क्र. 01 श्री. राजेश स्वामी यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. प्रज्ञा खोत, ॲड. शुभम देवळे यांनी काम पाहिले तर आरोपी क्र. 2 हनुमान वराडकर यांच्या वतीने ॲड. शाम गोडकर यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर हकिकत अशी कि, तत्कालीन खत निरिक्षक श्री. मानिक सखाराम त्र्यंबके यांनी कृषी आयुक्तलयाच्या आदेशान्वये ‍ दि. 11/01/2012 रोजी तालुका खरेदी विक्रि संघ वेंगुर्ला या ‍ठिकाणी जाऊन वर्धमान फर्टिलायझर्स ॲन्ड सिड्स प्रा. लि. या कंपनीने उत्पादित केलेले आणि संघाने विक्रिस ठेवलेले 18.18.10 या मिश्रणाच्या खताचे तपासणी करता नमुने घेतले व त्याचा पंचनामा करुत घेतलेला नमुना रासायनिक तपासणी करीता प्रयोगशाळा पुणे येथे येथे त्वरीत पाठविला होता. प्रयोगशाळेमध्ये तपासणी अंती सदरचा नमुना हा अप्रामाणित आढळुन आला होता. त्यामुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार खत निरिक्षक श्री. मानिक सखाराम त्र्यंबके यांनी उत्पादक वर्धमान फर्टिलायझर्स ॲन्ड सिड्स प्रा. लि. यांचे मार्केटिंग मॅनेजर श्री. राजेश स्वामी आणि वेंगुर्ला तालुका खरेदि विक्रि संघाचे व्‍यवस्थापक श्री. हनुमान बाबाजी वराडकर यांचे विरुध्द खत ‍ नियंत्रण आदेश 1985 चे कलम 3 सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 7 (1) (a) (ii) अन्वये मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस यांचे न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
सदर केसची सुनावणी मे. मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस श्री. ए. ए. चेंडके यांचेसमोर पूर्ण झाली, आरोपींतर्फे न्यायालयासमोर कृषी निरिक्षक यांच्या कार्यपध्दतीतील त्रृटी निदर्षणास आणुन देण्यात आल्या, सुणावणी अंती आरोपी तर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन दोनही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

error: Content is protected !!