आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत मंदार शिरसाट यांचा उपक्रम
कुडाळ येथील मराठा हॉल येथे आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून नेटका संवाद साधला. या नीटनेटक्या आयोजनातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून आयएएस परीक्षा व इतर साधनांबद्दल माहिती देण्यात आली. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या चला कुडाळ घडवूया या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रमुख पाहुणे म्हणून उमेश गाळवणकर, अरविंद शिरसाट, श्री बागवे सर, श्री गुरबे सर, मराठा हॉलचे महेंद्र गवस, कुडाळ संत राउल महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. ठाकूर सर, मनोज वालावलकर, नितीन नेमळेकर, अनंत जामसांडेकर सर, राजू केसरकर, सागर तेली आणि अन्य मान्यवर उपस्थित होते
संवादानंतर दत्ताप्रसाद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांची मुक्त चर्चा केली. स्वतःच्या शैक्षणिक आयुष्यात व कॉलेज आयुष्यात कशाप्रकारे आपण यशस्वी होण्याकरता कशाप्रकारे मार्गक्रमण केले पाहिजे याचे देखील त्यांनी विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने त्यांचे आभार मानले
कार्यक्रमावेळी शिरसाट सर यांनी मार्गदर्शन करताना मंदार शिरसाट यांच्या नीटनेटच्या आयोजनाचे कौतुक केले व अशाच प्रकारचे कार्यक्रम हवेत अशा शुभेच्छा दिल्या
त्याच प्रकारे संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुरवसे मॅडम यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम क्वचितच होतात. अशा कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्वतःच्या भविष्यासाठी फायदा करून घ्यावा असे आवाहन केले. उमेश गाळवणकर म्हणाले, की दुसरा कोणताही युवा कार्यकर्ता असता तर डिसेंबर एंडिंगला आज ऑर्केस्ट्रा ठेवला असता, मात्र मंदार शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांची गरज समजून असा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानून घेत असलेल्या मेहनती बद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





