प्रसाद मसुरकर यांची अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला सदस्यपदी निवड

कणकवली/मयूर ठाकूर
माध्यमिक विद्या मंदिर कनेडी प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रसाद नारायण मसुरकर यांची अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई या संस्थेच्या राज्यस्तरीय सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
प्रसाद मसुरकर यांनी गेली पंधरा वर्षे साने गुरुजी कथामालेचे काम करीत असून साने गुरुजी संस्कार परीक्षा, साने गुरुजी कथाकथन स्पर्धा, साने गुरुजी व्याख्यानमाला , साने गुरुजींच्या विचारांचे प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले असून अनेक वर्ष साने गुरुजी कथामाला कणकवली तालुका अध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मंडळाने राज्य कार्यकारणी स्वीकृत सदस्यपदी निवड केली आहे.
शनिवार दिनांक 10 जानेवारी व 11 जानेवारी 2026 रोजी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे 58 वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन बेळगाव येथे आयोजित करण्यात आले असून त्याठिकाणी प्रसाद मसुरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. साने गुरुजींच्या विचारांचे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला सल्लागार समिती प्रमुख तसेच माजी विस्तार अधिकारी मोहनराव सावंत यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले आहे.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला सदस्यपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रसाद मसुरकर यांची निवड झाल्याबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीशजी सावंत, उपाध्यक्ष पी डी सावंत, सरचिटणीस शिवाजी सावंत आणि संचालक तसेच शालेय समिती चेअरमन आर एच सावंत आणि सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बी एम बुराण आणि शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





