एमएनजीएलच्या सीएनजी आणि डीपीएनजीच्या किमतीत घट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएनजीएलने सीएनजी आणि डीपीएनजीच्या किमती कमी केल्या आहेत. अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) कंपनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किरकोळ विक्री किंमतीत ३१ डिसेंबर २०२५/१ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपासून कपात केली आहे. सीएनजीच्या किमतीत करांसह प्रति किलो १.०० रुपये कमी करण्यात आले आहेत. सीएनजीची किरकोळ विक्री किंमत ८४.६५ रुपये प्रति किलोवरून ८३.६५ रुपये प्रति किलो करण्यात आली आहे.
एमएनजीएलने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती पाईपद्वारे नैसर्गिक वायू (डीपीएनजी) च्या किरकोळ विक्री किंमतीतही ३१ डिसेंबर २०२५ / १ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपासून कपात केली आहे. डीपीएनजीची किंमत करांसह प्रति एससीएम १.००/- रुपये कमी करण्यात आली आहे. डीपीएनजीची किरकोळ विक्री किंमत ५०.२५/- रुपये प्रति एससीएम वरून ४९.२५/- रुपये प्रति एससीएम करण्यात आली आहे.
वरील सुधारणांनंतर, एमएनजीएलचा सीएनजी सिंधुदुर्गातील सध्याच्या किमतीच्या पातळीवर, प्रवासी कार विभागासाठी आणि ऑटोरिक्षांसाठी सुमारे ३०%, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे सुमारे ५०% आणि सुमारे ३०% ची आकर्षक बचत होणार आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) अलीकडेच जाहीर केलेल्या सुधारित युनिफाइड टॅरिफ (यूएफटी) मुळे ही किंमतकपात करण्यात आली आहे. ही कपात १ जानेवारी २०२६ पासून लागू झाली आहे. या सुधारणेतून होणारी बचत ग्राहकांना दिली जात आहे. असे एमएनजीएल ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.





