प्राथमिक शिक्षक पतपेढीचा सहकार अभ्यास दौरा संपन्न

    सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्गनगरी च्या वतीने सहकार अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
       अभ्यास दौऱ्या दरम्यान संस्थेने कोपरगाव (शिर्डी) जि. अहिल्यानगर येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव या संस्थेस भेट देऊन संस्थेची माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची भेट घेत पतसंस्थेची इत्यंभूत माहिती समजून घेतली. यावेळी श्री. कोयटे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. अहिल्यानगर या संस्थेच्या कोपरगाव शाखेस भेट देत संचालक शशिकांत जेजुरकर यांचेमार्फत संस्थेची माहिती जाणून घेतली. सातारा येथे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. सातारा या संस्थेस भेट देऊन संस्थेच्या चेअरमन पुष्पलता बोबडे तसेच अधिकारी वर्ग यांचेकडून माहिती घेण्यात आली. यावेळी राज्य शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे उपस्थित होते. दि कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. कोल्हापूर या संस्थेच्या मलकापूर शाखेस भेट देऊन संस्थेची माहिती घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष महेंद्र पावसकर, संचालक सर्वश्री संतोष मोरे, नारायण नाईक, विजय सावंत, दयानंद दक्ष नाईक, संतोष राणे, श्रीकृष्ण कांबळी, मंगेश कांबळी, सीताराम लांबर, सचिन बेर्डे, किशोर कदम, अकौंटट मनोज सावळ, क्लार्क लक्ष्मण कसाबले, नाईक गुरुप्रसाद दळवी उपस्थित होते.
error: Content is protected !!