शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड – पोईप जिल्हा परिषद मतदार संघामध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड–पोईप जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबीर दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत पोईप वर्दम हायस्कूल येथे होणार आहे.

या आरोग्य शिबिरात डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. नागेश नागवेकर, डॉ. गौरव धुर्ये, डॉ. चंद्रकांत फड, डॉ. संदीप साळकर, डॉ. सुरेखा साळकर, डॉ. गॅब्रियल डिसोजा यांच्यासह विवेकानंद हॉस्पिटल, कणकवली येथील तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध आजारांवर तपासणी, उपचार तसेच आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषतः नेत्ररोग तपासणीची सुविधाही उपलब्ध असणार आहे.

पोईप व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!