‘आपला पैसा आपला अधिकार’ बाबत जागरूक राहा – नरेंद्र देवरे

कुडाळात ‘आपला पैसा आपला अधिकार’ मोहिमेचा शुभारंभ
आपला पैसा आपला अधिकार याबाबत प्रत्येक ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे गेल्या दहा वर्षात ज्यांनी बँक खाती ऑपरेट केली नाही अशांची करोड मध्ये रक्कम रिझर्व बँकेकडे जमा झालेली आहे. ग्राहक सतर्क राहिला पाहिजे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे यांनी कुडाळ येथे केले आपला पैसा आपला अधिकार मोहिमेच्या कालावधीत १०४ खात्यांमधील २२.७३ लाख रुपयांच्या दावा न केलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्यात आला.
आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या मालमत्तेच्या कार्यक्षम व जलद वितरण अंतर्गत आपला पैसा आपला अधिकार मोहिमेचा शुभारंभ कुडाळ येथे झाला
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक लि.सिंधुदुर्गच्या अधिकारी श्रीमती पी पी बागायतकर उपप्रादेशिक व्यवस्थापक, सिंधुदुर्ग, एमएच ग्रामीण बँक,श्री. सचिन नागरे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक एल.आय.सी. कुडाळ,श्री. एच. ए. जोशी एसबीआय सिंधुदुर्ग मुख्य व्यवस्थापक, स्नेहा आंबेकर, एल डी एम ऋषिकेश गावडे, मुख्य व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र कुडाळ अधिकारी बैजनाथ गुप्ता, वैभव पवार, निलेश वालावलकर विविध बँका आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी ग्राहक वर्ग आदी उपस्थित होता.
यावेळी बोलताना श्री देवरे म्हणाले, ज्यांनी दहा वर्षे खाते ऑपरेट केले नाही, अशांचा भरपूर करोडोंमध्ये जमा झालेला पैसा रिझर्व बँकेत आहे. हि राशी रिझर्व बँकेत जमा करावी लागते. तुमचा पैसा तुम्हाला माहित नाही. तुमचे नातेवाईक आजी आजोबा यांचा तुम्हाला माहित नसलेला रिझर्व बँकेकडे 62 हजार खाती रक्कम क्लेम झाली नाहीत. आपण आपले पैसे मिळतील याकरिता लाडकी बहिणी योजनेच्या रांगेत राहतो. अशा प्रकारचा आपला हक्काचा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे. जनजागृती निर्माण झाली पाहिजे. यासाठी बँकेच्या माध्यमातून हा आमचा प्रयत्न सुरू आहे. केवायसी व्यवस्थित केले तर तुमची राशी तुम्हाला मिळते. क्लेम करा, हक्काचा पैसा मिळविण्यासाठी जनजागृती निर्माण करा. आतापर्यंत आपल्या हक्काचा पैसा आपल्याला मिळावा यामध्ये फक्त दहा टक्के प्रगती झाली आहे. तुमचे पैसे तुम्हाला मिळावे यासाठी रिझर्व बँक आणि सर्व बँकेचा प्रामाणिक उद्देश आहे असे सांगितले.
भारतीय जीवन विमा निगमचे अधिकारी श्री जोशी, जिल्हा बँकेच्या श्रीमती बागायतकर यांनी सुद्धा मागदर्शन केले. जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक ऋषिकेश गावडे यांनी ठेवीदार शिक्षण व जनजागृति निधि अंतर्गत बँकामधील दावा न केलेल्या ठेवी निकाली काढण्याकरीता विशेष जिल्हास्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवी खातेदार किंवा खातेदार मयत असल्यास त्यांचा वारसाना परत करण्यात येणार आहे. ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत सर्व नामनिर्देशित पात्र लाभर्थ्यांनी या वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्या निर्देशानुसार सदर शिबीर आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे खातेदाराना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळविण्याची संधी मिळणार आहे. १० वर्षाहून अधिक काळ ज्या ठेवीवर दावा केलेला नाही अशा ठेवी “ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी” मध्ये हंस्तातरित करण्यात येणार. खातेदाराना अशा ठेवी परत मिळविण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे जिल्हा अग्रणी प्रबंधक, सिंधुदुर्ग ऋषिकेश गावडे यांनी सांगितले. या मोहिमेत सुमारे ३५० ग्राहकांनी सहभाग घेतला, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टॉल्सची मांडणी व व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांना वित्तीय संस्थांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. मोहिमेच्या कालावधीत १०४ खात्यांमधील २२.७३ लाख रुपयांच्या दावा न केलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्यात आला. सूत्रसंचालन धैर्यशील परभणीकर यांनी केले





