बालगोपाळ दिंडी मंडळ आचराच्या दिंडी भजनाने रसिक मंत्रमुग्ध

कोरल अपार्टमेंटच्या वार्षिक सत्यनारायण पुजेत सादरीकरण

कणकवली येथील कोरल अपार्टमेंटच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेत आचरा येथील बालगोपाळ दिंडी भजन मंडळाने विविध कलाविष्कारांसह सादर केलेल्या दिंडी भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या महापूजेनिमित्त कणकवली नुतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देत मंडळाच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत नुतन नगरसेवक लुकेश कांबळे आदी उपस्थित होते.
कणकवली बांधकरवाडी येथील कोरल अपार्टमेंट मधील ‌रहिवाशांनी आयोजित सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक भजनांसह सोसायटीच्या मुलांच्या नृत्यादी कार्यक्रमांनी रंगत आणली होती. रात्री बालगोपाळ मंडळाच्या दिंडी भजनाने पावला नृत्यासोबतच विठ्ठल, महादेव, स्वामी समर्थ, साईबाबा, श्रीराम, हनुमान, भवानीमाता यांसह छत्रपती महाराजांच्या तुकोबा भेट भवानी दर्शनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. उत्तर रात्री पर्यंत चाललेल्या या कलाविष्कारात बुवा मंदार आचरेकर आणि सहकाऱ्यांच्या सुश्राव्य भजनाने रंगत आणली होती.
कणकवली नुतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कोरल अपार्टमेंट येथे भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी कोरल तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत नुतन नगरसेवक लुकेश कांबळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!