हुंबरट येथील ट्रक दुचाकी अपघातात युवक ठार

गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे चाललेल्या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अमन गणी खतिब (२२, रा. राजापूर) असे अपघातात मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात हुंबरट तिठा येथे बुधवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक वृत्त असे, अमन खतिब हा कामानिमित्त राजापूर येथून दुचाकीवरून सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीतील काम आटपून तो पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. हुंबरट तिठा दरम्यान महामार्गावरून सर्व्हिस रोडच्या दिशेने जात असलेल्या चिरेवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याचा नादात ट्रकला मागाहून दुचाकीस्वार अमन याने जोरदार धडक दिली. या धडकेत अमन याच्या डोक्याला व अन्य ठिकाणी गंभीर दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी मदत कार्य करत अमन याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमन याच्या अपघाताची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी काही वेळानंतर उपजिल्हा रुग्णालय दाखल झाले. मात्र, अपघातात अमनचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. अमनच्या गावातील मंडळी व त्याचे मित्र देखील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. अमन याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!