शेठ न. म. विद्यालय खारेपाटण मध्ये शालेय स्वराज्य सभा 2024-2025 साठी मतदान प्रक्रिया संपन्न

शेठ न. म. विद्यालय खारेपाटण मध्ये शालेय स्वराज्य सभा 2024-2025 साठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयात शालेय स्वराज्य सभेसाठी लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सुरळीत पार पडली. प्रत्येक वर्गातील एकूण सात प्रतिनिधींनी सात विद्यार्थी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान केले. मतदान केंद्राच्या बाहेर विद्यार्थी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सदर मतदानास मतदान अधिकारी म्हणून प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. मोटे सर,श्री जाधव सर, श्री. हरयाण सर व श्री शिंदे सर यांनी कामकाज पाहिले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत खालील खालील उमेदवार विजयी झाले
1) शालेय प्रतिनिधी- कु. श्रुती ब्रह्मा जामसंडेकर
2) वाचनालय प्रतिनिधी – कु. सई प्रवीण लोकरे
3) सांस्कृतिक प्रतिनिधी- कु.संस्कृती संजय भोर
4)स्वच्छता प्रतिनिधी – कु. आदिती मंगेश पांगरे
5)क्रीडा प्रतिनिधी – कु. सुजल संदीप पवार
6)अर्थ प्रतिनिधी कु.अथर्व ऋषिकेश जाधव
7) मुलींचा प्रतिनिधी- कु. पुनम पवन चांदिलकर हे उमेदवार विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे, उपाध्यक्ष- श्री भाऊ राणे,सचिव श्री महेशजी कोळसुळकर, सहसचिव श्री.राजेंद्र उरणकर व संस्थेचे सर्वपदाधिकारी ,खारेपाटण प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.संजय सानप सर, पर्यवेक्षक श्री राऊत सर, सर्व शिक्षकवृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!