गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी खारेपाटण सरपंच-प्राची इस्वलकर , उपसरपंच-महेंद्र गुरव ऍक्शन मोड वर

सामाजिक बांधिलकी जपत खारेपाटण गावातील मुख्य रस्त्यांची केली साफसफाई
सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाच्या तयारी ची लगबग चालू आहे. प्रत्येक जण आपल्या घरी बाप्पा येणार या आनंदाने आपापल्या घरची साफसफाई व बापाच्या आगमनाची करण्यात मग्न आहे. याच गणेशोत्सच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण ग्रामपंचायत सरपंच प्राची इस्वलकर,उपसरपंच -महेंद्र गुरव यांनी सामाजिक भान राखत खारेपाटण ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सोबत खारेपाटण येथील मुख्य रस्त्यांची साफसफाई करून घेतली आहे. गणेशोत्वाच्या काळात आपला गाव स्वच्छ असावा, येणाऱ्या गणेशोत्सवाच्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही… गणेशोत्सव हा सण अतिशय सुंदर पद्धतीने साजरा व्हावा, येणाऱ्या भाविकांना मनसोक्त सणाचा आनंद घेता यावा यासाठी खारेपाटण ग्रामपंचायत प्रयत्न करत असल्याचे सरपंच प्राची इस्वलकर यांनी सांगितले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण