SDPF फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी ओम उन्हाळकर याने अंतिम फेरीत पटकावले सुवर्णपदक

नेपाळ पोखरा याठिकाणी पार पडत असलेल्या SDPF फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये रिप्रेझेंट टीम इंडिया साठी खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कु. ओम उन्हाळकर (3000 मीटर धावणे) या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून आपली यशाची घोडदौड कायम ठेवली आहे.ओम हा होतकरू व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याला सुरुवातीपासूनच खेळाची खूप आवड होती. खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याची ही आवड जोपासण्यात प्रशालेतील क्रीडा शिक्षक यांनी त्याला सहकार्य व प्रोत्साहन दिले. प्रशालेत ॲथलेटिक स्पर्धेसाठीचे क्रीडा शिबिर राबवण्यात आले होते त्याचाही त्याला फायदा झाला.
त्याच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लोकरे, उपाध्यक्ष- श्री भाऊ राणे,सचिव श्री महेशजी कोळसुळकर, सहसचिव श्री.राजेंद्र उरणकर व संस्थेचे सर्वपदाधिकारी ,खारेपाटण प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.संजय सानप सर, पर्यवेक्षक श्री राऊत सर, सर्व शिक्षकवृंद यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण