आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांची कार्यतत्परता

आचरा मालवण येथे रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवले

आचरा मालवण रस्त्यावर साटम लंच होम समोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी स्वतः पुढाकार घेत जांभ्या दगडाच्या सहाय्याने खडडे बुजविले‌ यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभय भोसले, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, तसेच किशोर आचरेकर यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या कार्यतत्परतेबद्धल वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!