संजय गांधी निराधार योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर
३ नामंजूर, ३ फेर चौकशीसाठी पाठवले
संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ४० प्रस्तावांपैकी ३४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर ३ प्रस्ताव फेरचौकशी व ३ प्रस्ताव वयाच्या अटीत बसत नसल्याने नामंजूर करण्यात आले.समितीची बैठक अध्यक्ष सुधीर दळवी याच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात झाली.
संजय गांधी निराधार समितीचे सचिव तथा तहसीलदार अमोल पोवार, समितीचे सदस्य प्रदीप नाईक, अंकुश वेटे, दीक्षा महालकर, दीपक जाधव, गटविकास अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी पाटकर, नगरपंचायत प्रतिनिधी संजय शिरोडकर आदी उपस्थित होते. तहसीलदार निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे मिळून एकूण ४० प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आले. त्यापैकी ३४ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली.उर्वरित ३ प्रस्ताव फेरचौकशीसाठी ठेवण्यात आले तर ३ प्रस्ताव लाभार्थी वयाच्या अटीत बसत नसल्याने नामंजूर करण्यात आले.
प्रतिनिधी, दोडामार्ग