दामिनी पालव प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देणार !

दत्ता सामंत यांची ग्वाही
दामिनीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन
वर्दे येथील दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दत्ता सामंत यांनी त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून संशयिताला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि समाजात योग्य संदेश जावा, यासाठी या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक, संजय पडते, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर, पंचायत समिती सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्या श्रावणी तेरसे, घनश्याम तेरसे, कीर्तिकुमार तेरसे, स्वरूप वाळके, काका कुडाळकर, विनायक राणे, सागर पालव, वर्देचे पोलीस पाटील तसेच कडावल-वर्दे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




